Naresh Mhaske Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'पिंजरे मे पोपट बोले...' शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची संजय राऊतांवर हल्लाबोल

संजय राऊत साहेब रोज तुम्ही ज्या आमदार-खासदारांच्या नावाने खडे फोडताय, त्यांच्याच मतांवर तुम्ही खासदार म्हणून निवडून आला आहात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिंदे गटात ठिगण्या उडत असून लवकरच त्याचा स्फोट होईल असा मोठा दावा संजय राऊतांनी  (Sanjay Raut) केला आहे. राऊतांच्या दाव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. संजय राऊत ज्यावेळी बोलतात, त्यावेळी एका हिंदी चित्रपटाचं गाणं आठवतं. पिंजरे मे पोपट बोले अशा पद्धतीने कुरमुड्या ज्योतिषीसमोरील जे कार्ड असतं तो ते कार्ड उचलतो आणि जे कही बोलायचं आहे ते बोलतो.

अशा पद्धतीने कुरमुडे ज्योतिषी जे आहेत राऊत साहेब, रोज सकाळी उठतात कार्ड उचलतात आणि बोलायला सुरुवात करतात.मुळात गद्दार कोणाला म्हणतात? काँग्रेसमधून शरद पवार साहेब बाजूला झाले ते काँग्रेसचे खासदार होते, आमदार होते. मग शरद पवार साहेबांच्या पण कपाळावर गद्दार लिहिलंय का? असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला. (Maharashtra Politics News)

भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसलं मग त्यांच्या बाजूला मग कसे बसता? प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसमधून तुमच्याकडे आल्या त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेलं आहे.सचिन आहेर अजून किती जणांची नावे घेऊ ज्यांना तुम्ही आमदार केलं त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेलं दिसलं नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.

संजय राऊत साहेब रोज तुम्ही ज्या आमदार-खासदारांच्या नावाने खडे फोडताय, त्यांच्याच मतांवर तुम्ही खासदार म्हणून निवडून आला आहात. गद्दारांची मत तुम्हाला चालली का? हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि उतरा रिंगणात, असं आव्हानही त्यांनी संजय राऊतांना दिलं.

लोकांमधून तुम्ही कधी निवडून आलेले नाहीत.नाशिकमध्ये तुम्ही क्लीन बोल्ड झालेले आहात. तुमच्यामुळे शिवसेना संपलेली आहे आणि शिवसैनिक तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार. आता तरी आत्मपरीक्षण करा. उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, या पोपटाचं तोंड बंद करा नाहीतर उरलेली जनता देखील तुम्हाला सोडून निघून जाईल, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT