निवृत्ती बाबर
Gujarat Election Results News : गुजरात राज्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात (BJP) भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसचा 'सुफडा साफ' झाला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास अभिनंदन केले आहे. (Latest Marathi News)
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ' गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे'.
'गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधान सभेचे निकाल लागले व तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. तर दिल्ली 'मनपा ' निवडणुकीत 'आप'ने भाजपवर मात केली. याबद्दलही ठाकरे यांनी काँग्रेस व आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गुजरात विजयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.'
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'पंतप्रधान मोदी हे ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. आपने गुजरातेत मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.