500+ Workers Join Shiv Sena Shinde Group Saam Tv News
महाराष्ट्र

Shivsena Politics: एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! ठाकरे बंधूंच्या २ शिलेदारांनी हाती धरलं धनुष्यबाण, ५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश

500+ Workers Join Shiv Sena Shinde Group: ठाकरे गटाचे दोन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल, ५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. "शासन आपल्या दारी" कार्यक्रमात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

Bhagyashree Kamble

मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिसत असतानाच, शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होताना दिसतो आहे. कारण ठाकरे बंधूंच्या दोन महत्त्वाच्या शिलेदारांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. अंधेरीतील झायलो सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील झायलो सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नगरसेवकांसह आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यामातून विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही धनुष्यबाण हाती घेतलंय. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाचे अधिक बळ वाढलं आहे.

यावेळी ठाकरे गटाचे माजी नगरसेविका सुनिता इलावडेकर यांनी मशालची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलंय. त्यांचा आज पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक अविनाश सावंत यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे मनसे आणि ठाकरे गटाला धक्का बसला असून, मुंबईत शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढलं आहे.

यावेळी इतर पक्षातील ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनीही शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करत पक्षाची ताकद वाढली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

शिवसेनेच्यावतीने दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी तसेच "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत जनतेपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा विशेष कार्यक्रम नेस्को सेंटर, गोरेगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, खासदार रविंद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. तसेच विविध शासकीय दाखले वाटप देखील करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सणासुदीचा काळ! एक तोळा सोन्याचा दर किती? वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; कापूस, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

Manoj jarange Patil :...तर भविष्यात फडणवीसांना दुष्परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Manoj jarange patil protest live updates: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

High Protein Foods: प्रोटीनची गरज आहे? फक्त मांसाहार नाही, 'या' ५ सुपरफुड्समधून मिळवा जास्त प्रोटीन

SCROLL FOR NEXT