Sanjay Raut  Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut On Dada Bhuse: मालेगावातील ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, संजय राऊतांचा दादा भुसेंवर हल्लाबोल

Sanjay Raut News : शिवसेना काय हे पहायच असेल तर निवडणूक आयोगाने इथे येऊन पहावं.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut Speech : शिवसेनेच्या ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसेंवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मालेगावमधील सभेला उपस्थित जनतेला उद्देशून संजय राऊत म्हणाले की, हे तुफान उसळलं आहे. या तुफानाला आता कोणी रोखू शकत नाही. हे 'मालेगाव के शोले' आहेत. शिवसेना काय हे पहायच असेल तर निवडणूक आयोगाने इथे येऊन पहावं.

सकाळपासून टीव्हीवर उद्धव ठाकरेंच्या तोफेच्या तोंडी कोण? असं दाखवलं जातंय. यावर मालेगावच्या ढेकणाला मारायला तोफेची गरज नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी दादा भुसे यांना लगावला. (Political News)

शिवसेना फुटलेली नाही, सगळ्या जाती धर्मातील लोक शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत. शिवसेना कुठेही तुटलेली नाही, हललेली नाही, झुकलेली नाही. इलेक्शन कमिशनने चिन्ह काढलं असेल, नाव काढून घेतलं असेल पण बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आजही ठामपणे या जमिनीवर उभी आहे. तिच्या हातात भगवा झेंडा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

सुहास कांदेला रस्त्यावर फेकायच आहे

कांद्याला भाव नाही. कांदा रस्त्यावर फेकला जातोय. पण आपल्याला सुहास कांदेला रस्त्यावर फेकायच आहे. ज्याने गद्दारी केली त्याला त्याच खोक्याखाली चिरडायचे आहे, असं आवाहन संजय राऊत यांनी उपस्थितांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT