arvind sawant and eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय सांगता येईल? शिवसेना खासदाराचा शिंदे गटाला प्रश्न

'घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय सांगता येईल? असा सवाल खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदे गटाला केला आहे.

सुरज सावंत

Arvind Sawant News : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्हा कुणाला मिळणार? यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. या दोन्ही गटाचा वाद कोर्टात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे आज शिवसेनेच्यावतीने सचिव अनिल देसाई यांनी सर्व प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. शिवसेनेने (Shivsena) निवडणूक आयोगाकडे महत्वाची कागदपत्रे सादर केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सांवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी 'घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय सांगता येईल? असा सवाल खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदे गटाला केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले, 'आम्ही सादर केलेल्या सर्व प्रति या सत्य आहेत. शिवसेना कुणाची तर शिवसैनिकांची आहे. आमदार-खासदार कोण? त्यांना निवडून दिलं म्हणून आम्ही निवडून आलो. धनुष्यबाण चिन्ह पक्षाला मिळालं आहे. आम्हाला निडवणुकीसाठी १९६६ साली चिन्ह मिळालं'.

'शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. मान्यता प्राप्त पक्षात जी निवड होते. त्यांना पक्षप्रमुख करतात. नुकतीच आमची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. त्यात २०२३ पर्यत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली. त्यामुळे हे कोण?, असा सवाल खासदार सावंत यांनी शिंदे गटाला केला.

'घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय दाखवता येऊ शकतो? पक्षाचा प्रस्ताव तसा मांडला का? गुवाहाटीत मांडला की गोव्याला मांडला? त्यामुळे त्याच सर्व गोष्टी संविधानाला धरून नाहीत. सर्वोच्च न्यायालयात आम्ही हेच मत मांडलं', असे अरविंद सांवत म्हणाले.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानत लिहिलेले शेड्युल १० हे जाणीवपूर्वक झाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पक्षांतर बंदीचा कायदाच त्यासाठी बनवण्यात आला. मात्र, हाच कायदा पायदळी तुडवला जात आहे, असेही अरविंद सावंत म्हणाले.

'कायदा कसा झुकविला जातो. संस्थांचा वापर कसा होतोय हे जनता पाहतेय. त्याची ही उदाहरण आहेत. निवडणुक आयोगाने २४ तासही दिलेले नाहीत. आमचे प्रतिज्ञा पत्रक वेळेत पोहूनही ते पोहचवण्याबाबत नवे आदेश दिले. कुठेतरी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. मूळात हे जाणीवपूर्वक केलं जातयं. ते जनतेच्या लक्षात येतयं', असेही खासदार अरविंद सावंत म्हणाले.

'बाळासाहेब यांनी कधीही जात पात मानली नाही. मोहन भागवत यांनी त्याला समर्थन दिलं, भारत हा सर्वधर्मिय देश आहे. परवा उद्धवजींनी आपले याबाबत विचार मांडले ते मार्मिक आहेत. मंडल कमिशनला विरोध करणारा एकमेव माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे. सदर निर्णय घेताना त्यांनी राजकिय फायदा व तोटा होईल हा विचार केला नाही, असे खासदार सावंत म्हणाले.

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे सादर केली कागदपत्रे

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण कागदपत्र सादर केली आहेत. कागदपत्रांचा महत्वाचा तपशील साम टीव्हीच्या हाती लागला आहे. विधानसभेतील १४ आमदार विधान परिषदेतील १२ आमदार लोकसभेतील सात खासदार राज्यसभेतील तीन खासदार शिवसेनेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमधील १६० सदस्य, १८ राज्य प्रभारी असल्याचा दावा कागदपत्रात केला आहे. तसेच १९२ जिल्हाप्रमुख, ६०० उपजिल्हाप्रमुख , ७०० तालुकाप्रमुख असल्याचा दावा त्यांनी कागदपत्रात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT