Devendra Fadnvis, Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

सरकार बेकायदेशीर असेल तर पुढे सुद्धा सर्व बेकायदेशीर चालेल, सावंत यांचा घणाघात

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत (Presidential election) एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. राष्ट्रपतिपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होणार असून आदिवासी समाजाच्या उमेदवार मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठबळ देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि शिवसेनेच्या खासदारांमध्ये चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सावंत यांनी शिवसैनिकांच्या निष्ठेचा दाखला देत असतानाच बंडखोर आमदारांवरही निशाणा साधला. दोन तृतीयांश लोक पक्षातून बाहेर पडू शकत नाहीत, तर त्यांचा वेगळा गट त्यांना प्रस्थापित करता येत नाही. जे लोक पक्षद्रोह करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. सरकार बेकायदेशीर असेल तर पुढे सुद्धा सर्व बेकायदेशीर चालेल, असा घणाघात सावंत यांनी विरोधकांवर केला आहे. (Breaking News Today)

यावेळी सावंत माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, राष्ट्रपतिनिवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितलं की, मी सर्व खासदारांसोबत चर्चा करून निर्णय घेईल. आज दुपारी खासदारांची बैठक लावली आहे, त्या बैठकीनंतर निर्णय होईल. चौदा जणांचा शिवसेना खासदारांचा ग्रुप ? त्या चौदा जणांची नावं आम्हाला द्या, ती नावे जाहीर करा, असं आव्हान सावंत यांनी एकनाथ शिंदे गटाला अप्रत्यक्षरित्या दिले आहे. तसंच ते पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिहिलेल्या संविधानवर घाव घालण्याचं जे काम होतंय, याची मला चिंता वाटते. (Latest Marathi News)

कायद्याने तो गट विलीन करायला सांगितला आहे, असा निर्णय दिलाय. विधानसभा अध्यक्षांनी आमदारासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, आता हा दिलासा नेमका कोणाला ? असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे. बेकायदेशीर तयार झालेल्या सरकारला संरक्षण देण्याचे काम केले जाते आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. शरद पवार यांनी नाराजी हा शब्द वापरला नाही, मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले होते.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : कांद्याने बळीराजाला रडवलं! प्रति किलो विकला फक्त १ रुपयात, चहा-पाण्यालाही पैसे उरले नाहीत

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

MI vs CSK: दुखापत सँटनरच्या खांद्याला, तरीही शार्दुल कसा खेळला? मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर

Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT