BJP/Shivsena Saam TV
महाराष्ट्र

'मुंगीही हत्तीला भारी पडू शकते;' भाजप खासदारांच्या टीकेला शिवसेना आमदारांच प्रत्युत्तर

'निकाल तुमच्या बाजूने लागला असेल, तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करीत आहात ? दमदाटीची भाषा कशाला करता, ते दिवस आता संपले'

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या भाजप खासदार संजय पाटील आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या मध्ये नागेवाडी येथील यशवंत साखर कारखान्याच्या (Sugar Factory) प्रश्नावरून चांगलीच जुंपली आहे. यशवंत कारखान्याच्याबाबतीत निकाल लागल्यानंतर अजून कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2012 - 13 साली जिल्हा बँकेने यशवंत कारखाना विक्रीस काढल्यावर आपण टेंडरच्या माध्यमातून त्यावेळच्या ऑफसेट प्राईसपेक्षा 28 कोटी रूपये जास्त देवून यशवंत कारखाना घेतला होता आणि त्याच्यानंतर सेल सर्टिफिकेट आणि पझेशन दिल्यानंतर अनिलभाऊंनी कोर्ट मॅटर (Court Matter) सुरू केला असल्याचं वक्तव्य भाजप (BJP) खासदार संजय पाटील यांनी केलं आहे.

'गेल्या नऊ वर्षामध्ये कोर्ट प्रकियेमुळे मला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु मी कधीही व्यक्तीगत टीका, टिप्पणी केलेली नाही. माझी कायदेशीर लढाई सुरू होती. त्यामुळे कायदेशीर लढाईला सामोरे जात होतो. नुकताच पंधरा दिवसांपुर्वी कारखान्याच्याबाबतीत निकाल लागला आहे. यशवंत कारखाना कुणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय घोटाळे झाले ? त्याला जबाबदार कोण ? यावर खोलात जाऊन योग्यवेळी लोकांसमोर बोलेन. लागलेल्या निकालाच्या आधारे कारखाना (Sugar Factory) मी खरेदी केलेला आहे. तुम्ही त्याच्याविरूध्द कोर्टात गेलेला आहात हायकोर्ट त्याबाबत निर्णय देईल. आपण काही करायचं नाही आणि दुसर्‍याला काही करून द्यायचं नाही, ही भूमिका आता सोडा. मी शेतकर्‍यांसाठी, सभासदांसाठी करणार आहे. हे लोकांपुढे सांगायचा खोटं नाटक बंद करा. निकालामुळे तुमचं पितळ उघड झालं आहे असं म्हणत खासदार संजय पाटील (MP Sanjay Patil) यांनी कारखान्याच्या झालेल्या अवस्थेवरून अनिल बाबर यांना लक्ष्य केलं.

हे देखील पहा -

मात्र त्यांच्या याआरोपाला शिवसेना (Shivsena) आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, 'यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल, तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करीत आहात ? दमदाटीची भाषा कशाला करता, ते दिवस आता संपले आहेत. त्यामुळे असली भाषा कोणीच करू नये, आणि तुम्ही तर लोकसभा सदस्य आहात तुम्हाला हे शोभतच नाही. मुंगीही हत्तीला भारी पडू शकते अशा शेलक्या शब्दांत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी खासदार संजयकाका पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT