Sanjay Shirsat-Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Political News : सुषमा अंधारे ठाकरे गटातील नेत्यांनाच डोईजड झाल्यात? संजय शिरसाटांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Shirsat Comment on Sushma Andhare: संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभही घसरली.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar: ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या राज्यभरातील दौऱ्यावर आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर त्या ठाकरे गटाच्या वतीने फिरत आहे. अवघ्या माहिती महिन्यांत सुषमा अंधारे यांचं पक्षातील राजकीय वजन चांगलंय वाढलंय. मात्र पक्षातील काही नेत्यांना हेच मान्य नाही की काय असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी कारण ठरलंय शिवसेनेचे खासदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य.

संजय शिरसाट यांनी दावा केला की ठाकरे गटानेच नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे यांनी मला फोन केला. म्हणे ती बाई (सुषमा अंधारे) डोक्याच्या वर झाली आहे. (Political News)

संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभही घसरली. ती बाई सर्वांना म्हणते हे माझे भाऊ आहेत. सत्तार माझे भाऊ, भुमरे माझे भाऊ, काय काय लफडे केले तिने काय माहित, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

संभाजीनगरमध्ये मोठी रॅली काढणार

शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्याची जल्लोष संभाजीनगरमध्ये केला जाणार आहे. येत्या 8 किंवा 9 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्ये येणार आहेत. चंद्रकांत खैरेंवर बोलून वेळ वाया घालवू नका. सगळ्यांना माहित आहे ते रोज कोणाला फोन लावातात. तर दुसरे जे आहेत ते आता नेहमीच मुंबईत असतात, असा टोलाही अंबादास दानवे यांना त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT