MLA Nitin Deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

मला हार्ट अॅटॅक आलाच नाही, घात करण्याचा डाव; नितीन देशमुख म्हणाले, मी उद्धव ठाकरेंसोबत!

शिवसेना आमदार नितीन देशमुख नागपुरात पोहचले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे सूरतवरून थेट नागपुरात पोहचले आहे. मला हार्ट अॅटक आलाच नव्हता. जबरदस्तीने माझ्या दंडात इंक्जेक्शन टोचण्यात आलं. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असं नितीन देशमुख यांनी पत्रकारांना सांगितलं आहे. (Shivsena MLA Nitin Deshmukh Latest Marathi News)

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाविरोधात बंड करून सुरतला गेलेल्या एका शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. सुरतमध्ये दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आमदार नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. (Nitin Deshmukh Marathi News)

नितीन देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आता आमदार नितीन देशमुख हे नागपुरात दाखल झाले असून त्यांनी आपल्याला कोणताही हार्ट अॅटॅक आला नसल्याचं पत्रकारांना सांगितलं आहे.

इतकंच नाही तर, नितीन देशमुख यांनी मोठे खुलासे केले आहे. अॅटॅक आल्याचा बनाव करून मला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे माझ्यावर कोणती तरी शस्त्रक्रिया करण्याचा डाव होता. अशा प्रकारचा गंभीर आरोप शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे सूरतला गेलेले शिवसेनेचे आमदार खरचं दशहतमध्ये आहे का? अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Success Story : पतीची साथ सुटली, वडिलांची सावली हरपली; मुलीसाठी लढली अन् पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Chivda Vs Murmura: चिवडा की मुरमुरा, वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Purandar Fort : ४,४७२ फूट उंचीवर वसलेला भव्य पुरंदर किल्ला, गडाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Tata Aeris Launched: खुशखबर! ₹5.29 लाखांत आली टाटाची नवी कार, फीचर्सही जबरदस्त

SCROLL FOR NEXT