MLA Nitin Deshmukh saam tv
महाराष्ट्र

Nitin Deshmukh : राणे, रवी राणा, किरीट साेमय्या टपाेरी, देवेंद्रजी त्यांना आवरा; उद्धवजींवर बाेलाल तर... नितीन देशमुखांचा भाजपला इशारा

राणांच्या जागाी आता मविआचा उमेदवार निवडून येईल असे आमदार नितीन देशमुख यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati News: अमरावती येथील एसीबी कार्यालयात आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांची सकाळपासून त्यांच्या संपत्तीबाबतची चौकशी करण्यात आली. या चाैकशीनंतर एसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडलेल्या आमदार नितीन देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबावर टीका करणा-या भाजप (bjp) नेत्यांना टपाेरी असे म्हणत त्यांना इथून पुढे साेडणार नाही असा सज्जड दम माध्यमांशी बाेलताना दिली.

आमदार नितीन देशमुख म्हणाले नवनीत राणा (navneet rana) यांचे पती आमदार रवी राणा (ravi rana) यांची स्वतःच्या कर्तृत्वावर ओळख नाही. खासदार नवनीत राणा यांचे पती म्हणून ज्यांची ओळख आहे ते अपक्ष निवडून आले नसून राष्ट्रवादीच्या जिवावर निवडून आले. (Maharashtra News)

त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा (ncp) पाठिंबा होता. ते पंधरा हजार मताधिक्याने निवडून आले पण आता त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस दिसणार नाही. त्या ठिकाणी आता शिवसेना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असेही आमदार नितीन देशमुख यांनी नमूद केले.

आमदार नितीन देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले मी फडणवीसांना सांगू इच्छितो आपले जे टपोरी लोक आहेत. ज्या टपोरी लोकांच्या खांद्यावर तुम्ही बंदूक ठेवून उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर वारंवार आघात करता अशा नवनीत राणा, नितेश राणे, नारायण राणे, रवी राणा, किरीट साेमय्या यांनी जर उद्धव ठाकरे यांच्या घराण्यांवर काही चुकीचे आरोप करण्याचे प्रयत्न केले तर आम्हांला सुद्धा त्यांचे नेते मोदी आणि कुटुंबावर प्रतिकार करावा लागेल.

आम्हाला पण मोदीजींच्या कुटुंबावर बोलता येते. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो पण उद्धव ठाकरे (uddhav thackeray) सुद्धा आमच्यासाठी मायबाप आहेत असे म्हणत आमदार देशमुख यांनी आमच्या कुटुंब प्रमुखावर काेण बाेलले तर त्याला साेडणार नाही असा इशाराही दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Politics: त्यांना पक्ष वाढवायचाय की संपवायचाय?, शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेत्यांवर निशाणा

Palash Muchhal Networth: स्मृती मंधानाचा पतीची आहे इतक्या कोट्यवधींचा मालक

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT