uday samant, nitin deshmukh, eknath shinde, shivsena, akola saam tv
महाराष्ट्र

...म्हणून उदय सामंतांनी एकनाथ शिंदे गटाची वाट धरली असावी : आमदार नितीन देशमुख

आज (रविवार) दुपारपासून मंत्री उदय सामंत यांचा फाेन लागत नसल्याने राजकीय गाेटात एकच खळबळ उडाली आहे.

जयेश गावंडे

अकोला : शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) हे देखील आता नगरविकास मंत्री शिवसेनेचे (shivsena) बंडखाेर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे या गटात प्रवेश करणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान सामंत यांच्यावर ईडीचा (ED) दबाब टाकण्यात आला असावा असे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी भावना व्यक्त केली आहे. (uday samant latest marathi news)

आज (रविवार) दुपारी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे गुजरातमधील सुरत (surat) येथे गेले आहेत. ते कदाचित शिंदे गटाक सामील हाेणार आहेत असे म्हटले जात आहे. त्यावर शिवसेना आमदार नितीन देशमुख म्हणाले सामंत यांना धमक्या येत असतील. त्यामुळे ते तसा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असतील.

देशमुख पुढे म्हणाले सामंत गेले जरी असतील तर निश्चितपणे परत येतील असा मला विश्वास आहे. ते कट्टर शिवसैनिक आहेत. अनेक आमदारांना ईडीचा धाक आणि ऑफर भारतीय जनता पक्ष देत असल्याचे देखील देशमुख यांनी म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT