Anil Parab Saam TV
महाराष्ट्र

RTO च्या 'या' सुविधेचा घरबसल्या मिळणार लाभ; १७ ते १८ लाख नागरिकांना होणार फायदा

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत सरकार विचाराधीन आहे - अनिल परब

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : परिवहन आयुक्तालयामार्फत फेसलेस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी लागणारी एनओसी, डुप्लिकेट लायसन्स, पत्ता बदल आणि आरसी मधील पत्ता बदल, परवान्यांचे नूतनीकरण (license) संदर्भातील कामासाठी नागरिकांना आरटीओ (RTO) मध्ये जावं लागणार नाही. या योजनेमुळे जवळपास १७ ते १८ लाख नागरिकांना घरबसल्या आरटीओच्या योजनेता लाभ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना आरटीओत फेरफटका मारण्याची आवश्यकता लागणार नाहीय. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या योजनेच्या शुभारंभ केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यंमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभाग काम करत आहे. तालुक्यात अपघात होणारे ब्लॅक स्पॉट किती आहेत, त्यात काय सुधारणा करण्यात आल्या, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. लो स्पीड इलेक्ट्रिक गाड्या हाय स्पीडने पाळविल्या जात आहेत.हजार इलेक्टरीक गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

लो स्पीडचा फायदा घेत कोणी कायदा मोडत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. इलेक्ट्रिक वाहने लो स्पीड बनविण्याचे लायसन्स बनून हाय स्पीड केल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली जाईल. एसटीच्या 2000 गाड्या इलेक्ट्रिक आणि 1000 गाड्या सीएनजी ताफ्यात घेणार आहोत. तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत सरकार विचाराधीन आहे, असंही परब यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Ambulance Crash : एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅश, रूग्णासह ७ जणांचा मृत्यू; कुठे घडली दुर्घटना?

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे ₹१५०० जमा झाले, तुम्हाला आले का?

EPFO मध्ये मोठा बदल; आधीच्या बंद झालेल्या PF खात्यातील पैसा येईल थेट तुमच्या बँक खात्यात

Pune : पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा अचानक छापा, खिडकीतून तरूणीची उडी, जागेवरच मृत्यू

SCROLL FOR NEXT