Eknath Shinde Banner saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी : शिवसैनिक आक्रमक! बंडखोर एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला, काळी शाई फेकून निषेध

शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून एकनाश शिंदे गट आणि शिवसेनेचा (Shivsena) संघर्ष पेटला असून राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे तीव्र पडसाद नागपुरातही उमटले आहेत. शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर (Eknath Shinde banner) शिवसैनिकांनी फाडले आहेत. तसेच बॅनवर काळी शाई फेकून शिंदे यांचा निषेध केला आहे.

शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे गट (Balasaheb Thackeray) असं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून नागपुरात या बंडाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. बाळासाहेबांचं नाव शिंदे गटाला देता येणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर केला आहे. तसंच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना नेतेपदावरुन हटवण्यात आलं आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक करुन तोडफोड केली आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनुषंगाने मुंबईतील (Mumbai) सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उप आयुक्त यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या कार्यलायाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राजकीय कार्यक्रमाच्या बंदोबस्त लावण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

तसेच कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आक्षेपार्ह पोस्टर, बॅनरवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून पोलीस विभागाकडून मुंबईत १४४ सीआरपीसी अनुसार जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT