Uddhav Thackeray At Matoshree saam tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'ला जय महाराष्ट्र! गद्दारांना सोडणार नाही, मातोश्रीबाहेर शिवसैनिक संतापले

बंडखोर आमदारांविरोधात शेकडो शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या इतिहासाची पाने उलगडली, तर बंडाच्या राजकारणाचे चॅप्टर दिसतील.पण शिवेसनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोडलेलं बंडाचं निशाण इतिहासाच्या पानात पुसता येऊ शकत नाही. शिवसेनेच्या भात्यातील जवळपास तीसपेक्षा अधिक बंडाचे बाण शिंदे यांच्या खांद्यावरुन आमदारांनी थेट मातोश्रीवर (Shivsena Matoshree) सोडले आहेत. त्यामुळे शेकडो कट्टर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन करुन दिला आहे.

आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे तमाम शिवसैनिकांशी आणि राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले. समोरा-समोर येवून चर्चा करा, मी राजीनामा देतो. असं म्हणत ठाकरे यांनी नाराज आमदारांना आवाहन केलं. त्यावेळी वर्षा बंगला सोडणार असल्याचे संकेतही ठाकरे यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी नुकताच वर्षा बंगला सोडला असून ते मातोश्रीवर पोहोचले आहेत.

त्यावेळी शेकडो शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन करत गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. बाळासाहेबांचा जीव शिवसेना आहे आणि गद्दारांना आगामी होणाऱ्या निवडणुकांत तळागाळातील शिवसैनिक त्यांची जागा दाखवतील, असाही सज्जड इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. तसेच मातौश्रीवर मुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच शिवसैनिकांनी ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

दरम्यान, लोकांचा नाथ एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ, अशा आशयाचे बॅनर शिंदे समर्थकांनी लावले आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची (Anand Dighe) शिकवण पुढे घेवून जाणारे एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा, असं या बॅनरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांमध्ये भर पडत असल्याचे चित्र दिसून येतंय .कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे वर्चस्व असून एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीत आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT