Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare : सुषमा अंधारेंची तुफान फटकेबाजी, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळावर टीकास्त्र

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हापकिन बद्दल बोलायला तयार नाही, असा आरोप करून राज्यातील मंत्र्यांना अक्कल नसल्याचा आरोप केला.

साम टिव्ही ब्युरो

गोंदिया : शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे या गोंदियात आल्या होत्या.

राज्य सरकारमध्ये महिला बालकल्याण मंत्री म्हणून एकाही महिलेवर जबाबदारी सोपवली नाही. मग महिलांची समस्या सांगायच्या कुणाला, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.(Maharashtra News)

एकनाथ शिंदे गरीब शेतकरी हेलीकॉप्टरने शेतात येतात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मालखाऊ खाते स्वतःकडे ठेवले आहेत. मागील सात वर्षांपासून ते मंत्री आहेत. त्यांच्या शेतात उतरायला दोन हेलिपॅड आहेत, त्यामुळे ते गरीब कसले, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित करून ताशेरे ओढले.

सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले. मात्र लावलेले वृक्ष कुठे दिसत नाही. त्यामुळे वृक्ष लपवून तर, ठेवले नाही ना? असा खोचक प्रश्न सुषमा अंधारे उपस्थित केला.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हापकिन बद्दल बोलायला तयार नाही, असा आरोप करून राज्यातील मंत्र्यांना अक्कल नसल्याचा आरोप केला.

लबाड खोकेवाल्यांना हद्दपार करा, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी उपस्थितांना केलं. बच्चू कडू यांचा पक्ष वाढल्यास त्यांना डोकेदुखी होईल, त्यामुळे बच्चू कडू यांना संपवण्यासाठी रवी राणांना पुढे केल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT