Shiv Sena News Today, Rajan Salvi News, Latest Marathi News Update, latest politics news in marathi saam tv
महाराष्ट्र

Shivsena : षडयंत्र रचणारे भाजप नेते संपतील; राजन साळवींचे भाकीत

यापूर्वी त्यांनी अन्याय झाला म्हणून पक्ष सोडला.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Rajan Salvi : सध्याच्या साऱ्या घटनांमध्ये भाजपचा (BJP) हात आहे. त्यांचंही षडयंत्र आहे. त्यामुळे भविष्यात भाजप आणि त्यांचे नेते नष्ट होतील असे भाकीत शिवसेनेचे (Shivsena) उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन सुरु असलेल्या घटना घडामाेडींवर साळवींनी त्यांचे मत माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले. (Breaking Marathi News)

निवडणूक आयोगानं साेमवारी दाेन्ही गटास पक्षाचं काय नाव असावा याचा निर्णय दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटास मशाल चिन्ह दिलं. त्यावर शिवसेना उपनेते राजन साळवी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केला. यावेळी साळवींनी थेट भाजपला लक्ष केलं. (Shivsena Latest Marathi News)

साळवी म्हणाले मशालीचा अर्थ हा अंधारातून प्रकाशाकडे जाणे असा आहे. त्यामुळे शिवसेना जोरात घोडदौड करेल असा विश्वास आम्हां सर्वांना आहे. तसेच निशाणी आणि नाव न मिळाल्याने आमच्यावरती अन्याय झाला हे शिंदे गटाची ओरड हास्यास्पद असल्याचं देखील यावेळी साळवी यांनी म्हटलं आहे. (Rajan Salvi Latest Marathi News)

यापूर्वी त्यांनी अन्याय झाला म्हणून पक्ष सोडला. आता तेच अन्याय झाला म्हणून बोलत आहेत असा उपरोधिक टोला देखील यावेळी साळवी यांनी लगावला आहे. सध्याच्या साऱ्या घटनांमध्ये भाजपचा हात आहे. त्यांचंही षडयंत्र आहे. त्यामुळे भविष्यात भाजप आणि त्यांचे नेते नष्ट होतील असे भाकीत शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी केले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

SCROLL FOR NEXT