Manohar Joshi Passed Away: Saamtv
महाराष्ट्र

Manohar Joshi News: हिंदुहृदयसम्राटांचा एका ओळीत आदेश अन् मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपद सोडलं; नेमकं काय घडलेलं?

Manohar Joshi News: मनोहर जोशी यांची बाळासाहेबांवर श्रद्धा होती. याचाच एक गाजलेला किस्सा म्हणजे मातोश्रीवरुन आलेल्या एका आदेशाने मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Gangappa Pujari

Manohar Joshi Passed Away:

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक, प्रबोधनकार ठाकरे ते आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ठाकरेंच्या चार पिढ्यांसोबत काम केलेला सुसंस्कृत, संयमी नेता काळाच्या पडद्याआड गेला. मनोहर जोशी यांची बाळासाहेबांवर श्रद्धा होती. याचाच एक गाजलेला किस्सा म्हणजे मातोश्रीवरुन आलेल्या एका आदेशाने मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

काय होता किस्सा?

१९९५ मध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनोहर जोशी यांची शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. १९९५ साली शिवाजी पार्क मैदानावर मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मात्र १९९९ मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे जावई गिरीश व्यास यांच्या शाळेसाठी पुण्यातील एक भुखंड राखून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले. ज्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.

यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना एक संदेश पाठवला. ज्यामध्ये "प्रिय मुख्यमंत्री, तुम्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा आणि तात्काळ राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. त्यानंतर मला भेटायला या,' असा मजकूर लिहण्यात आला होता. या एका आदेशावरुन मनोहर जोशी यांनी तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT