Deepali sayed News, devendra fadnavis News
Deepali sayed News, devendra fadnavis News saam tv
महाराष्ट्र

आग लावण्याचा प्रयत्न केलात तर...; दीपाली सय्यद यांचा फडणवीसांना इशारा

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 'सूर्याकडे पाहून थुंकलं तर ती थुंकी स्वत:च्या तोंडावर पडते, त्यांनी सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल.'अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर नुकतीच केली होती. त्यानंतर आता दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी पलटवार करत फडणवीसांवर निशाणा साधला होता. फडणवीस साहेब तुमच्या मनातील सूर्यापेक्षा (sun) हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खूप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सूर्याला सुद्धा आम्ही भीक घालणार नाही. सूर्यावर कसे थुंकतात याचे धडे आम्हाला श्रीलंकेकडून घेण्याची गरज नाही. शिवसेना (Shivsena) अंगार आहे, असा घणाघात दीपाली यांनी फडणवीसांवर केला आहे. (Deepali sayed News in Marathi)

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वातावरण तापल्याने भाजपच्या गोटातून दीपाली यांचा निषेध करण्यात आला. दीपाली यांच्यावर कारवाई करण्याची भाजपची मागणीही जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे दीपाली सय्यदही भाजपच्या नेत्यांवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल करत आहेत.

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपच्या गोटातून दीपाली यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. दीपाली यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. दिपाली सय्यद यांच्या विरुद्ध नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, प्रणिता चिखलीकर-देवरे, अॅड.वर्षा डहाळे, रिदा रशीद, रिटा मकवाना,शिल्पा गणपत्ये, प्रिया शर्मा आदींच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर या शिष्टमंडळाने सय्यद यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सादर केले. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याचे निवेदन नुकतेच दिले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT