Shivsena Mla Ambadas Danave Saam Tv
महाराष्ट्र

'एकनाथ शिंदेंनी मला फोन करून...', आमदार अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

आमदार अंबादास दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी वाताहत झाली आहे. सुरूवातीला आमदार त्यानंतर खासदार आणि आता थेट शिवसेना (ShivSena) नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. अजूनही काही स्थानिक पातळीवरील पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. अशातच औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Shivsena Ambadas Danve Latest News)

'एकनाथ शिंदे यांचा मला देखील फोन आला होता, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे', असं गौप्यस्फोट आमदार दानवेंनी केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी बुधवारी शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?

या बैठकीत नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अंबादास दानवे म्हणाले की, 'मला एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं मी, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांनी मला तुला मदत केली असल्याचे सांगितले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्ही पक्ष म्हणून मदत केली, स्वतः व्यक्तिगत नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे होते म्हणून तुम्ही मदत केली. त्यामुळे तुम्ही देखील भूलथापांना बळी पडू नका, असे देखील पदाधिकाऱ्यांना दानवे यांनी सांगितले आहे. (Ambadas Danve Eknath Shinde News)

दरम्यान, यावेळी अंबादास दानवे पदाधिकाऱ्यांना म्हणाले की, आपल्या येथील काही आमदार तुम्हाला सांगतील की, तुमच्यासाठी हे केलं, ते केलं. पण त्याला सांगा तुला निवडून मी आणलंय. तुम्हाला निवडून येण्यासाठी आम्ही काम केलं, असं सांगा, असं आवाहन दानवे यांनी शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना केलं.

इतकंच नाही तर, 'कुठल्याही गद्दाराची आठवण येणार नाही, एवढी जनता आपल्यासोबत आहे. कुणाची आठवण येण्याची गरजही नाही. कुणी म्हणेल तुमच्यासाठी इतकं काम केलं आहे, पण शिवसेना होती म्हणून तुम्ही ते काम केलं होतं बाकी, काही नाही, असा टोलाही देखील आमदार दानवे यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: हळद लावली, पाया पडला आणि...! कुलदीच्या हळदी समारंभात चहलची मस्ती, पाहा व्हिडीओ

FASTag Pass: फास्टॅग पासच्या किंमती वाढल्या; १ एप्रिलपासून लागू; किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Aishwarya Narkar : "कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून..."; ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावले खडेबोल, थेट स्क्रीनशॉट केले शेअर

भरधाव कारने तरुणीला फुटपाथवर चिरडले, २०० मीटर फरफटत नेलं; बाईक, रिक्षा अन् कारला धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT