shivsena, ncp, congress, udaya samant, ratnagiri shivsena saam tv
महाराष्ट्र

एक, दाेन गेलेत तिकडं, रत्नागिरीतील कडवट शिवसैनिक म्हणाले आमचं ठरलं...!

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारा कडवट शिवसैनिक जागा झालाय. त्यांनी ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे भविष्यात उदय सामंत गट आणि कडवट शिवसेना गट असे दोन गट पहायला मिळाले तर वावग वाटायला नको.

अमोल कलये

रत्नागिरी : आमदार उदय सामंत (uday samant) हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात गेल्याने रत्नागिरीत (ratnagiri) शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे. आज शिवसैनिकांनी बैठक घेत आगामी काळात रत्नागिरीतील सेना आणखी बळकट करण्याचा निर्धार केला. येत्या दोन दिवसांत खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा घेण्याचे नियाेजन करण्यात आले आल्याची माहिती सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक व जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली. (ratnagiri latest marathi news)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकिय वर्तुळात मोठा भूकंप झालेला आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आमदार एकनाथ गटात सामिल झालेत. दापोली - मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम (yogesh kadam) आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही अपवादात्मक पदाधिकारी सोडले तर जवळपास सर्वांनीच या कठीण काळात आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचा निर्धार केला आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली आहे

येत्या दोन दिवसांत खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मोठा मेळावा रत्नागिरीत होईल अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिली आहे.

मी शिवसेनेतच - उदय सामंत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामिल झालेत. सध्या ते गुवाहटीला आहे. रत्नागिरीतील शिवसैनिक आक्रमक झाल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण शिवसेनेतच असल्याचे म्हटलय. तसेच कोणाच्याही गैरसमजाला बळी पडू नका, मतदारसंघातील जनतेने, पदाधिकाऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT