Chiplun, Bhaskar Jadhav, Chiplun Police Station, Nitesh Rane, Nilesh Rane, Shivsena, shivsainik saam tv
महाराष्ट्र

Chiplun : राणे बंधूंवर गुन्हा दाखल करा; शिवसैनिकांचा चिपळूण पाेलिस ठाण्यात राडा

मंगळवारी रात्री आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Chiplun : राणे बंधू यांच्यावर गुन्हा दाखल करा. काेणाच्याही दबावाला बळी पडू नका. चरसी राणे येतात आणि येथील वातावरण बिघडवून टाकतात. त्यांना जिल्हा बंदी करा अशी मागणी आज (बुधवार) शिवसैनिकांनी चिपळुण पाेलीसांनी केली. दरम्यान या मागणीचा जाेर लावत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांचे चिरंजीव विक्रांत भास्कर जाधव आणि शिवसैनिकांनी (shivsainik)चिपळूण पोलीस ठाण्यात राडा घातला. (Chiplun Latest Marathi News)

आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्यात भाजपचा हात आहे असा दावा करत शिवसैनिक चिपळूण पाेलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी आमदार जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी निलेश राणे (nilesh rane) आणि नितेश राणे (nitesh rane) या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवसैनिकांच्यावतीने मागणी केली.

यावेळी शिवसैनिकांनी जोपर्यंत भास्कर जाधव यांच्या परिवाराला सुरक्षा मिळत नाही व जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नसल्याचा पावित्रा घेतला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी देखील राणे यांच्यामुळे कायदा व सुवव्यस्था बिघडत असल्याचे म्हटलं.

दरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला प्रकरणात शिवसैनिकांनी भाजपचे परिमल भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिमल भोसले यांना पोलीस ठाण्यात आणलं आणि तातडीने सोडलं याचे गाैडबंगाल काय असा जाब शिवसैनिकांनी पाेलिसांना विचारला. सध्या सर्व शिवसैनिक पाेलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT