ratnagiri , refinery, vinayak raut , aditya thackeray saam tv
महाराष्ट्र

Shivsena : आदित्य जी ! खासदार विनायक राऊत हे..., वाचा शिवसैनिकांची तक्रार

विराेध करणा-या दाेन चार गावांना रिफायनरी प्रकल्पातून वगळावे असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

अमोल कलये

Ratnagiri News : शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या विराेधात खूद्द शिवसैनिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीचं पत्र साम टीव्हीच्या हाती लागले असून या पत्रात खासदार राऊत हे रिफायनरीबाबत (refinery) दिशाभुल करीत असल्याचे म्हटलं आहे.

ही तक्रार खासदार विनायक राऊत यांच्या विराेधात शिवसेनेचे राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण आणि ग्रामस्थांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. या पत्रात शिवसैनिकांनी ठाकरे यांच्याकडे एक मागणी देखील केली आहे.

शिवसैनिकांनी केलेल्या पत्राची प्रत साम टिव्हीच्या हाती लागली आहे. या पत्रावर विभागप्रमुखापासून ते शिवसेनेच्या ग्रामपंतायत सदस्यांपर्यंत सर्वांच्या सह्या आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या भुमिकेबद्दल नमूद करण्यात आलं आहे. ९० टक्के ग्रामस्थांचा विरोध असल्याचं चुकीचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून हाेत असल्याचे त्यात म्हटलं आहे.

राजापूर तालुक्यातील सव्वाशे गावांचा प्रकल्पाला पाठिंबा विरोध करणाऱ्या दोन ते चार गावात विरोधाचा सुर आहे. त्यामुळं त्यांना वगळून प्रकल्पाला मुर्त स्वरुप देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी देखील शिवसैनिकांनी पत्रातून केली आहे. आता या पत्रावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भुमिकेकडं काेकणातील शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT