eknath shinde, sangli, anandrao pawar, shivsainik, Eknath Shinde Latest News, Shivsena News Update, Latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढं नेण्याचा सेना जिल्हाप्रमुखाचा निर्धार; एकनाथ शिंदे गटात दाखल

सांगली जिल्ह्यात हिंदुत्वाचा विचार तळागळात पाेहचविणार असल्याची भावना आनंदराव पवार यांनी व्यक्त केली.

विजय पाटील

सांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर कार्यरत राहणार असल्याचे शिवसेनेचे ग्रामीण (sangli) जिल्हाप्रमुख आनंदराव पवार (anandrao pawar) यांनी नमूद केले. पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Eknath Shinde Latest Marathi News)

आनंदराव पवार म्हणाले मुंबई येथे जाऊन आम्ही कार्यकर्त्यांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांना आम्ही तुमच्या समवेत कार्यरत राहून हिंदुत्वाचा (Hindutva) विचार पुढे नेणार असल्याची ग्वाही दिल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आम्ही आहोत. कायम कट्टरच राहणार परंतु सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय व निर्धार केला आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसैनिकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीत असूनही शिवसैनिकांवर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून (NCP) प्रचंड अन्याय झाला. महाविकास आघाडीची अभद्र युती मान्य नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आम्ही पाठिंबा देत असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT