shivs sena uddhav thackeray faction andolan in washim  saam tv
महाराष्ट्र

Washim: मागणी तितका पूरवठा करा अन्यथा..., ठाकरे गटाचा कृषी व्यावसायिकांना इशारा

खत उपलब्ध असूनही जे व्यापारी शेतकऱ्यांना देत नाहीत त्यांचे गोडाऊन सील करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News :

साठा असताना देखील शेतक-यांना खत दिले जात नसल्याने वाशिम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सभापती सुरेश मापारी आणि इतर पदाधिकारी आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कृषी विभागाील अधिकाऱ्यांना सोबत घेत कृषी केंद्रांवर छापे टाकले. यामुळे एकच खळबळ उडाली. (Maharashtra News)

वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रब्बीच्या पिकांना युरिया खताची मागणी वाढलेली असतांना मागील महिन्याभरापासून खताची टंचाई होती. मात्र दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात 2 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असतांनाही व्यापाऱ्यांकडून एका शेतकऱ्याला अवघे दोन ते पाच पोते युरिया दिला जात आहे.

त्यामुळे कृषी विषयक दुकानांसमोर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. साठा असतानाही खत दिले जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सभापती सुरेश मापारी आणि इतर पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत कृषी केंद्रांवर छापे टाकले. शेतकऱ्यांना हवे तेवढे खत देण्याची मागणी केली. मागणी तितका पूरवठा करा अन्यथा आमच्या स्टाईलने आंदाेलन छेडू असा इशारा शिवसैनिकांनी कृषी व्यावसायिकांना दिला. दरम्यान खत उपलब्ध असूनही जे व्यापारी शेतकऱ्यांना देत नाहीत त्यांचे गोडाऊन सील करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT