Sambhaji bhide News, Nitin chougale News, Bhima Koregoan Case latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

Bhima Koregoan Case: 'शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी देशवासियांची माफी मागावी'

बुधवारी अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंगे वाजले नाहीत. सर्वांनी नियमांचे पालन केले हे चांगलेच आहे असे नितीन चाैगुलेंनी नमूद केले.

विजय पाटील

सांगली : शरद पवार (sharad pawar) आणि प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी देशाची दिशाभूल करुन सर्वांची फसवणूक केली आहे. त्यांनी देशवासियांची माफी मागावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे (shivprathishtan yuva hindusthan) नितीन चौगुले (nitin chougale) यांनी केली आहे. चाैगुले यांनी येथे (sangli) माध्यमांशी बाेलताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले भीमा कोरेगाव दंगली बाबत पुणे पोलिसांनी भिडे गुरुजी यांचे नाव वगळले आहे. हा प्राथमिक विजय आहे. सर्वांनी मिळून सन्मान मोर्चा काढला होता. त्यात अनेक संघटनांनी पाठिंबा दिला हाेता. त्याचे हे यश आहे. षडयंत्र खोडून काढण्यात आले आहे असेही चाैगुले यांनी नमूद केले. (Bhima Koregoan Case latest Marathi news)

प्रकाश आंबेडकर यांनी भिडे गुरुजींवर आरोप केले. तसेच पवार साहेबांनी हिंदू संघटनेला बदनाम करण्याचे काम केले. पवार साहेबांनी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र दिले. वारंवार आरोप करायचे समाजामध्ये तेढ निर्माण करायचे हे याेग्य नसल्याचे चाैगुलेंनी नमूद केले.

चाैगुले म्हणाले शहरी नक्षलवाद टाळला पाहिजे. ज्यांनी ही दंगल घडवली त्यांच्या पर्यंत पाेलीसांनी पोहचले पाहिजे. मुख्यमंत्री यांना विनंती आहे. त्यांनी शाेध माेहिमेसाठी पुढाकार घ्यावा. दरम्यान भोंग्या (loudspeaker) बाबतीत राज ठाकरे (raj thackeray) यांची भूमिका कायदेशीर आणि योग्य आहे. बुधवारी अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंगे वाजले नाहीत. सर्वांनी नियमांचे पालन केले हे चांगलेच आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT