satara, shivendraraje bhosale, udayanraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara : कमिशनबाज..., खरं तर त्यांनी रिटायर व्हावे : शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर राेख

कमिशनबाजीमुळे कामे पुढे ढकलणे, हेच त्यांचे काम असून सातार शहराचा त्यांना विचार नाही अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर केली.

ओंकार कदम, Siddharth Latkar

Shivendraraje Bhosale : साताऱ्यात प्रशासक आला म्हणजे आपली जबाबदारी संपली का ? सत्तारुढ म्हणून तुम्ही पाच वर्ष पालिकेत बसला. आता तुम्हांला प्रश्न साेडविण्यासाठी वेळ नाही. काेणतेही प्रश्न साेडविण्यासाठी सातारा विकास आघाडी पुढे येत नाही. केवळ प्रशासनावर खापर फाेडणे याेग्य नाही. तुम्हांला जमत नसेल तर पुढच्या निवडणुकीस येऊ नका रियाटरमेंट घ्या असा टाेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्या सातारा विकास आघाडीवर केली आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) माध्यमांशी बाेलत हाेते. ते म्हणाले सातारा पालिकेत सध्या प्रशासक आहे. परंतु सत्तेत असलेली सातारा विकास आघाडी सध्या काेणत्याही मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नाही. ज्यांच्याकडे पालिका होती त्या उदयनराजेंच्या (udayanraje bhosale) घरासमोर असलेल्या रस्त्याची काय अवस्था आहे ? हे पत्रकारांनी जाऊन पहावे असेही राजेंनी नमूद केले. (Maharashtra News)

पालिकेवर प्रशासक असल्याने सत्ताधाऱ्यांनी याकडे दूर्लक्ष करायचे का असा सवाल करीत जबाबदारी घेणे जमत नसतील तर सातारा विकास आघाडीने पालिकेतून रिटायर्डमेंट घ्यावी असा टाेला शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या साविआला लगावला. (shivendraraje bhosale latest marathi news)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT