shivendraraje bhosale & udayanraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Valentine's Day: उदयनराजेंचा I Love U मेसेज आला का? शिवेंद्रराजे म्हणाले...!

आज व्हॅलेंटाईन डे असल्याने पत्रकारांनी शिवेंद्रसिंहराजेंना छेडले.

ओंकार कदम

सातारा : आजच्या व्हेलंटाईन डे (valentine day) दिवशी उदयनराजेंना काय शुभेच्छा देणार या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे (shivendraraje bhosale) यांनी मिश्किल उत्तर देत माझ्याकडे उदयनराजेंचा (udayanraje bhosale) नंबरच नसल्याचे सांगितले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी आज सुझलाॅन कंपनी संदर्भातल्या निर्णयाबाबत पत्रकार परिषद बाेलावली हाेती. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या व्हॅलेंटाईन डे (valentine day) व अन्य प्रश्नांवर राजेंनी दिलखूलास उत्तर दिली. (udayanraje bhosale latest marathi news)

शिवेंद्रसिंहराजे (shivendraraje bhosale) म्हणाले उदयनराजे नेहमी मला ड्रायव्हरच्या मोबाईलवरुनच फोन करतात. त्यामुळे माझ्याकडे उदयनराजेंचा मोबाईल नंबरच नाही. तुम्ही राजेंना संदेश पाठविणार आहात का? प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले माझ्याकडे त्यांचा नंबर नसल्याने त्यांच्या ड्रायव्हरला पाठवावे लागेल. मग ताे त्यांना कळवेल.

यावर पत्रकारांनी त्यांना तुमचा इच्छा आहे का त्यांना I Love U म्हणायची त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी नाही ना मी तुम्हांला ड्रायव्हरचं म्हणताेय असं म्हणताच पत्रकारांमध्ये हशा पिकला (Valentine's Day). सध्या दाेन्ही राजे भाजपात आहेत. पालिकेची निवडणुक जवळ आली आहे. शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांच्या आघाड्या मनाेमिलनातून लढणार की वेगवेगळ्या हे काळच सांगेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT