Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Political News: सत्तेत असताना अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची खोचक टीका

"अजित पवार सत्तेत असताना ज्या मस्तीत वागत होते त्याच्या दहा टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत, त्यामुळे अजित पवारांचं हे वक्तव्य हास्यास्पद"

संजय जाधव, साम टीव्ही

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची मस्ती आणि नशा डोक्यात जाऊ देऊ नये असा खोचक टोला अजित पवार यांनी सरकारला लगावला होता. त्यानंतर अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी समाचार घेतला आहे.  (Latest Marathi News)

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना प्रतापराव जाधव म्हणाले की, अजित पवार सत्तेत असताना ज्या मस्तीत वागत होते त्याच्या दहा टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत, त्यामुळे अजित पवारांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचा पलटवार खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक असा सामना राज्यात रंगला आहे. आपल्या वेगवेगळ्या निर्णयामुळेही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता 2 हजारच्या नोटा बंदीनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

याच बरोबर प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे तुरुंगातील दिवसावर पुस्तक लिहिणार आहेत, त्यामुळे त्यांना पुस्तक लिहिण्याची गरजच नाही. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांना सामना हे वृत्तपत्र  काहीही लिहिण्यासाठी खुला करून दिला असल्याची टीकाही खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Tourism: गुलाबी थंडीत फिरायला जायचा प्लान करताय? लांब नको सांगलीतील 'या' ठिकाणी मज्जा घेऊन याच

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल|VIDEO

प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर लीक? बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसनं पोस्ट शेअर करून दिली माहिती

Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहाचा हटके लूक; PHOTO पाहा

Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

SCROLL FOR NEXT