Ajit Pawar, Sharad Pawar and Amol Kolhe SAAM TV
महाराष्ट्र

Shirur Lok Sabha: शिरुर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अमोल कोल्हेंविरोधात कुणाला मिळणार उमेदवारी?

Shirur Lok Sabha constituency: शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला असून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

Satish Daud

Lok Sabha election in Shirur

शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला असून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना दिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज बुधवारी (ता. २०) अजित पवार (Ajit Pawar) शिरुर लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाला होणारा विरोध टाळण्यासाठी ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे. त्याचबरोबर ते दिलीप मोहिते पाटील यांची देखील मनधरणी करणार आहेत. (Breaking Marathi News)

शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंचा पराभव करणार, असं अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे म्हटलं होत. मात्र, कोल्हेंविरोधात नेमकं निवडणुकीच्या रिंगणात कुणाला उतरवायचं असा प्रश्न अजित पवारांसमोर होता.

अशातच शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन निवडणुकीच्या उमेदवारी देण्याचं अजित पवारांनी ठरवलं. मात्र, आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला.  (Lok Sabha Election 2024)

आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील २० वर्षाचा संघर्ष असल्याने त्यांचे काम करण्यापेक्षा मी राजकारण सोडून घरी बसेल, अशी ठाम भूमिका दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली. आता मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार शिरुरमध्ये जाणार आहेत.

त्याचबरोबर आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत ते कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहे. यानंतर एक ते दोन दिवसांत शिरुर लोकसभेतून आढळराव पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार, अशी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT