beed, police saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : साम टीव्हीच्या बातमीचा दणका; नशेसाठी युवकांना गोळ्यांची विक्री करणा-यास अटक

यामध्ये आणखी कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

विनोद जिरे

Beed News : साम टिव्हीने (saam tv) नशेडींचा नवा पॅटर्न ही बातमी दाखवल्यानंतर बीडमध्ये (beed latest news) नशेखोरांविरोधात कारवाईला सुरूवात झाली होती. मात्र आता नशेच्या गोळ्यासह चालता फिरता या गोळ्या विकणाऱ्याचा देखील एसपींच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. एपीआय विलास हजारे यांच्यासह टीमने एका पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या छाप्यात 120 गोळ्यांचे पॅकेट जप्त केली. त्यामध्ये तब्बल 1120 नशेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. (Breaking Marathi News)

या कारवाईत बीडच्या युवकांना (youth) गोळ्या बनवून नशेंडी बनवणाऱ्या मोहनसिंग हिरासिंग टाक (वय 20) यास पाेलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहनसिंगला नशेच्या गोळ्या बनवण्यासाठी सामान कोठून येत होतं ? या गोळ्यामध्ये तो काय काय वापरत होता ? जिल्ह्यात कुठं कुठं तो या गोळ्या विक्री करायचा ? त्याचबरोबर यामध्ये आणखी कोण शामिल आहे ? याचा तपास पोलीस करत आहेत.

याचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (भादवि कलम 328,276, सहकलम 18 a ,22 (1),18C,22 (3),28 , 27 b(2) औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच सह कलम 22 ( a) NDPS act 1985) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT