आमदाक आशिष जयस्वाल Saam Tv
महाराष्ट्र

शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड; विदर्भात एकही मंत्री नसल्याने नेते नाराज

आता सेनेचे जेष्ठ आमदार आशिष जयस्वाल पक्षावर नाराज आहेत.

संजय डाफ

नागपूर: भाजपनंतर आता शिवसेनतही अंतर्गत नाराजी असल्याचं पुढं आलं आहे. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या नंतर आता सेनेचे जेष्ठ आमदार आशिष जयस्वाल पक्षावर नाराज आहेत.

सेनेचा विदर्भात एकही मंत्री नाही, चार टर्म आमदार निवडणूक येऊनंही सन्मान नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत, ३० वर्षे सेनेचं काम चार टर्म आमदार असूनंही संधी नाही, विदर्भातील ११ जिल्हयात सेनेचा एकही मंत्री नाही, मग पक्ष कसा वाढणार? असे सवाल जयस्वाल यांनी उपस्थित केले आहेत.

एकीकडे भाजप आणि काँग्रेस विदर्भाकडे विशेष लक्ष देत असताना शिवसेनेचे मात्र विदर्भाकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आगामी मंत्रीमंडळ विस्तारत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भाला न्याय देतील, असा आशावादही त्यांना आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT