डिसीसी बँकेच्या सिरसदेवी शाखेच्या विरोधात शिवसेनेचे बेमुदत उपोषण विनोद जिरे
महाराष्ट्र

डिसीसी बँकेच्या सिरसदेवी शाखेच्या विरोधात शिवसेनेचे बेमुदत उपोषण

बीडमधील डिसीसी बँकेच्या सिरसदेवी शाखेच्या विरोधात शिवसेनेने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. शेतकऱ्याचं अनुदान तात्काळ वाटप करा अशी आंदोलकांची मागणी आहे.

विनोद जिरे

बीड: गेल्या आठ महिन्यांपासून शेतकऱ्याचं आलेलं अनुदान वाटप न केल्यानं शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या सिरसदेवी येथील डिसीसी बँकेच्या शाखेसमोर तात्काळ अनुदान वाटप करावं. ही मागणी घेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (Shiv Sena's indefinite fast in beed against the DCC Bank's Sirsadevi branch)

हे देखील पहा -

गेवराईच्या सिरसदेवी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रात 7 गावांचे अनुदान आले आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे काजळवाडी, धानोरा, डिग्रस, जळगाव, कांबी, गोळेगाव, खेर्डा बुद्रुक, खेर्डेवाडी, आम्ला या गावांमधील शेतकऱ्यांना एक ना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गेल्या महिनाभरापासून पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने दिलेला अनुदान वाटप करावे. या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कालिदास नवले यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान तात्काळ अनुदान वाटप करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कालिदास नवले यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

SCROLL FOR NEXT