Rajan Vichare Saam TV
महाराष्ट्र

Rajan Vichare: खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापेमारी नाहीच

Rajan Vichare: ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाकडून कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नाही. स्वत: राजन विचारे आणि त्यांच्या मुलीने याबाबत खुलासा केला आहे.

Ruchika Jadhav

Rajan Vichare News:

बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्या आधीच ठाकरे गटाला मोठा झटका मिळाला. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र ही माहिती खोटी असल्याचा खुलासा विचारे यांच्या मुलीने स्वत: केला आहे.

राजन विचारे यांच्या घरावर छापेमारी केली असून त्यांच्याशी संबंधीत व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलण्यात आलं आहे, अशीही चर्चा सुरू होती. मात्र असं काहीही झालेलं नसल्याचं त्यांच्या मुलीने स्पष्ट केलं आहे. राजन विचारे सध्या हैदराबाद येथे एका मिटींसाठी गेले आहेत.

राजन विचारे यांनी देखील याबाबत खुलासा केला आहे. माध्यमांशी फोनवर संवाद साधत त्यांनी सांगितलं की, माझ्या घरावर कोणत्याही प्रकारची छापेमारी झालेली नाही. तसे झाले असते तर मला नोटीस आली असती. माझ्या घराबाहेर देखील नोटीस लागली असती. माझ्या कोणत्याही घरी ईडी किंवा आयकर विभागाने धाड टाकलेली नाही, असं राजन विचारेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT