uddhav thackeray news  Saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! आता मोठं काही तरी घडणार? ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी

uddhav thackeray news : ६ खासदारांच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

उद्धव ठाकरे यांना पुन्हा हादरा

९ पैकी ६ खासदार फुटले

फुटींच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांच्याकडून बैठकीसाठी व्हिप जारी

उद्धव ठाकरे यांना पु्न्हा एकदा मोठा धक्का बसलाय. पक्षाचे ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय, या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाल्याचाही दावा केला जात आहे. ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदारांच्या फुटीदरम्यान ठाकरे गटाने बैठकसाठी सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. व्हीपनुसार ठाकरेंच्या खासदारांना बैठकीला हजेरी लावावी लागणार आहे.

६ फुटीर खासदार येत्या १९ जून रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. फुटीर खासदारांनी अद्याप माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे फुटीर खासदारांच्या विरोधात संजय राऊत यांनी जोरदार आगपाखड केली. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर अरविंद सावंत यांनी ठाकरेंच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

खासदार अरविंद सावंत म्हणाले, 'फुटीर खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले का, याचा काही पुरावा नाही. सर्व फुटीर खासदार कुठे आहेत, याचीही माहिती नाही. संविधानावर हल्ले होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ४ हजार ईव्हीएम मशीन जळाल्या'.

'एलआयसीत घोटाळा झाला. ते सर्वसामान्यांचे पैसे होते. एका पक्षातून ६ खासदार फुटल्याने देशावर कोणतं मोठं संकट पडणार आहे. त्यामुळे देशाचं नुकसान होणार नाही. परंतु डॉलर रुपयाच्या तुलनेत कमकुवत होऊ लागल्याने देशाचं नुकसान होत आहे. जगात भारताची अब्रू जात आहे. लोकशाही धोक्यात आहे. आम्ही बैठकीसाठी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे ते उद्या बैठकीला येतील, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने संगमनेर तालुक्यातील ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळा आणि फोटोला साडी घालून, वाकचौरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार वाकचौरे यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध करण्यात आलाय. गद्दारी करणाऱ्या वाकचौरे यांना 2014 प्रमाणेच चोप देऊ आणि मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digital Code: बारकोड आणि क्यूआर कोड यांच्यामध्ये काय फरक आहे?

Boiled Potato: शिळा उकडलेला बटाटा खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

Pawan Singh: प्रसिद्ध अभिनेत्याच्या इव्हेंटमध्ये गोंधळ; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT