Solapur Breaking News Saam TV
महाराष्ट्र

Solapur Breaking News: शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याचा राजीनामा

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

Political News :

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशात शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जयमहाराष्ट्र केलाय. संजय कोकाटेंचा हा निर्णय शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर कोकाटेंनी हा निर्णय घेतला असून स्वत: यामागचं कारण देखील सागितलं आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जे कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय कोकाटे यांनी घेतली आहे.

राजीनामा दिल्यावर माध्यमांशी संवाद साधताना कोकाटेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. भाजप मराठा आणि धनगर आरक्षणसंदर्भात समाजमध्ये भांडण लावत आहे, असा आरोप करत माढा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिलाय.

माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. आता कोकाटे आगामी लोकसभेच्या दृष्टीने काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT