Sanjay Raut on Kashmir Files Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: ‘द काश्मीर फाइल्स’नंतर काश्मीरी पंडितांवरील हल्ले वाढले; संजय राऊत काय म्हणाले, वाचा...

या सिनेमानंतर काश्मीरी पंडितांवरील हल्ले वाढले. सर्वात जास्त हत्या झाल्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut on Kashmir Files : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आल्यानंतर त्याचा ज्या प्रकारे एका पक्षाने गाजावाजा केला, त्यानंतर काश्मीरात सर्वात जास्त पंडितांची हत्या झाली, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. इतकंच नाही तर चित्रपट आल्यानंतर काश्मीरी पंडितांवरील हल्ले वाढले, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.  (Maharashtra Politics News)

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गोव्यातील इफ्फी या चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपट परीक्षक नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्स हा प्रोपगंडा करणारा आणि अश्लील चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट एका विशिष्ट पक्षाचा (भाजपचा) प्रचार करणारा आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा सिनेमा आहे. या सिनेमाचा एका पक्षाने खूप प्रचार केला. त्यामुळे या सिनेमानंतर काश्मीरी पंडितांवरील हल्ले वाढले. सर्वात जास्त हत्या झाल्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'केवळ प्रचारासाठी चित्रपट तयार केला'

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट हा फक्त प्रसिद्धीसाठी तयार केला गेला, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ 2 सिनेमा यावी अशी जेव्हा मागणी होते, तेव्हा या सिनेमाचे निर्माते यावर काही बोलत नाहीत. या सिनेमाच्या कमाईतून जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम काश्मीरी पंडितांच्या अनाथ बालकांना, कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली.

'बेळगावमध्ये बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट'

खासदार संजय राऊत  यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे. कारण, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यांना १ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

बेळगावमध्ये बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, कारस्थान केलं जातंय, मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. माझ्यावर हल्ला करण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे. मात्र, महाराष्ट्र झुकणार नाही मी बेळगावला जाणार, असं संजय राऊतांनी ठामपणे सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

Famous Historic Places : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

SCROLL FOR NEXT