Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : शिंदे गटात ठिणग्या उडत आहेत, कधीही मोठा स्फोट होईल; संजय राऊत काय म्हणाले, वाचा...

एकनाथ शिंदे यांच्या ठिगण्या उडत आहेत. त्यांच्या गटात काय चालू आहे, हे मला माहिती आहे. लवकरच त्याचे स्फोट होतील, असं खळबळजनक विधान संजय राऊतांनी केलं आहे.

Satish Daud

Sanjay Raut Latest News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठिगण्या उडत आहेत. त्यांच्या गटात काय चालू आहे, हे मला माहिती आहे. लवकरच त्याचे स्फोट होतील, असं खळबळजनक विधान संजय राऊतांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने तुरुंगातून बाहेर आलो आहे, असं संजय राऊत म्हणालेत. (Maharashtra Politics News)

काय म्हणाले संजय राऊत?

शिंदे गट (Eknath Shinde)  बाहेर पडल्याने शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही. महाराष्ट्रात कधीही निवडणूका घ्या, शिवसेना नव्या जोमाने नव्या चिन्हावर विजयी होईल, असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि माझा शब्द आहे, की आम्ही नांदगावपासून ते मालेगावपर्यंत जे आमदार, खासदार निवडून आणलेले आहे. आणि जे फुटून गेलेले आहेत. त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी शिंदे गटातील नेत्यांना दिलं आहे.

'शिवसेनेतून काही पालापाचोळा उडून गेला'

'मी नाशिकमध्ये कालपासून पाहतो आहे, मला अनेक लोकं भेटत आहेत. शिवसैनिक तसेच पदाधिकारी भेटत आहेत. सगळे जागेवरच आहे, काही पालापाचोळा उडून गेला असेल तो इकडे तिकडे उडतच असतो, आज या गटात तर उद्या त्या गटात हे काही महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही, शिवसेना आहे तशीच आहे', असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं आहे. (Latest Marathi News)

'शिंदे गटातील आमदाराला लोकांनी फक्त चप्पला मारणं...'

आम्ही शिंदे गटातील नेत्यांना खोके वाले म्हणून संबोधत नाही. त्यांना राज्यातील जनताच खोके वाले म्हणून चिडवत आहे. बच्चू कडूच यांनी तसं कबूल देखील केलेलं आहे. काल वैजापूरचे फुटलेले आमदार रमेश बोरनारे यांना लोकांनी फक्त चप्पला मारणं बाकी ठेवलं होतं, ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे. आज राज्यात सरकार आहे, आमदारांना जास्त सुरक्षा आहे म्हणून सर्व चाललेलं आहे, असा घणाघात देखील संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर लगावला आहे.

'शिंदे गटात लवकरच स्फोट होतील'

सुहास कांदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या अंतर्गत वादावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. माझी जी माहिती आहे, मी फक्त पक्षाचा नेताच नाही तर सामनाचा संपादक देखील आहे. त्यातही मला क्राईम रिपोर्टिंगचं जास्त ज्ञान आहे. त्यामुळे कुणाच्या डोक्यात काय क्राईम चालले आहे, हे मला पक्कं कळतं. त्या (शिंदे) गटामध्ये आता काय चालू आहे एकमेकांविरुद्ध याची पक्की खबर माझ्याकडे आहे. त्यांचे स्फोट लवकरच होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar Childhood Photos: कुरळ्या केसांचा हिरो! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे बालपणीचे हे फोटो पाहिलेत का?

Atal Pension Yojana: या कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹५००० वरुन १०,००० रुपये होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT