satara, shivsena, vaduj, farmers, rain, maharashtra government, cm eknath shinde saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena : शिवसैनिकांचा तहसिलदार कार्यालयावर धडक माेर्चा; दारावर बांधले कुजलेल्या पिकाचे ताेरण

राज्य सरकार शेतक-यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप शिवसैनिकांनी केला आहे.

ओंकार कदम

Satara News : पन्नास खाेके... या सरकारचं करायचे काय... शिंदे सरकार हाय हाय...शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घाेषणा देत सातारा जिल्ह्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने (shivsena) आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नाेंदविला. (Satara Latest Marathi News)

सातारा जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पडलेल्या परतीचा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खटाव, माण तालुक्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी वडूज येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन छेडलं. (Maharashtra News)

शिवसैनिकांनी शेतात कुजलेली शेतीपिके तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला बांधून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई प्रशासनाने द्यावी अशी मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदाेलनात सातारा जिल्हाप्रमुख प्रतापराव जाधव, तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्यासह माेठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले हाेते. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Organ donation: दरवर्षी 4-5 लाखांना अवयव प्रत्यारोपणाची गरज; 10 टक्क्यांहून कमी रुग्णांना लाभ, रुग्णालयाचा जनजागृतीसाठी पुढाकार

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, लाठ्या-काठ्या अन् विटांनी बेदम मारलं, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Maharashtra News Live Update: पंढरपूर- नीरेच्या पाण्यासाठी सांगोल्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

कोल्हापुरात मन हेलावणारी घटना, २ चिमुकल्यांचा जीव घेतला, त्यानंतर आईनेही आयुष्य संपवलं

Shocking : बारामती हादरली! आई आणि मुलाने संपवलं आयुष्य, पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला अन्...

SCROLL FOR NEXT