SHIV SENA CASE saam tv
महाराष्ट्र

'या' महिन्यात होणार मोठा राजकीय भूकंप? शिवसेना कुणाची, खासदाराने थेट तारीखच सांगितली

Shiv Sena Party Symbol Case: शिवसेना पक्ष-चिन्हाबाबतची सुनावणी अंतिम टप्प्यात आलीये. दोन्ही बाजूंनी कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू असतानाच आता ठाकरेसेनेनं मात्र मोठा दावा केलाय?... हा दावा नेमका काय आहे?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची कायदेशीर लढाई आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे कोर्टात पुराव्यांची आणि व्हीपच्या वैधतेची जोरदार जुगलबंदी सुरू असताना, दुसरीकडे सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याचा दावा करत संजय राऊतांनी मोठं भाकीत वर्तवलंय. दरम्यान संजय राऊतांनी शिवसेनेच्या सुनावणीची ही भविष्यवाणी करण्याआधी 17 नोव्हेंबरला शिंदेसेनेनं 21 जून 2022च्या बैठकीचा आणि व्हॉट्सअप मेसेजचा मुद्दा कोर्टात मांडलाय...शिंदेसेनेचे वकील ध्रुव मेहता युक्तिवादात म्हणाले की...

21 जून 2022 रोजी ठाकरेसेनेने बोलवलेल्या बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नमूद नव्हता

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बैठकीचा मेसेज पाठवण्यात आला

बैठक दुपारी साडेबाराची होती आणि शिंदेंना मेसेज दुपारी 12.31 वा. आला

ठाकरेसेनेच्या व्हीपमध्ये कोणतीही स्पष्टता नव्हती

ठाकरेसेनेचा पुरावा म्हणजे हा केवळ व्हाट्सअॅप मेसेजचा स्क्रिनशॉट

योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, दीपक लांडेंनी बैठकीनंतर सह्या केल्या

तरीही त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती

अपात्रतेचा दावा पुराव्यांच्या आधारे सिद्ध होणं आवश्यक आहे

विधानसभा अध्यक्षांच्या अंतर्गत तपासणी होणं गरजेचं

दुसरीकडे, भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती चुकीची असून ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती, असा युक्तिवाद ठाकरेसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 20 नोव्हेंबरला कोर्टात केलाय...

कोर्टात काय घडलं?

कपिल सिब्बल

ठाकरेसेनेचे वकील

सिब्बल- गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती चुकीची

सिब्बल-गोगावले यांची नियुक्ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती

सिब्बल- फेब्रुवारी 2023 पासून शिंदेंचा राजकीय पक्ष आहे

सिब्बल- म्हणजे त्यापूर्वी आम्ही पक्ष होतो ना

सिब्बल- या सगळ्याबाबत गुवाहाटीत बसून व्हीप कोण, हे शिंदे ठरवू शकत नाही

सिब्बल- एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही

सिब्बल- एकनाथ शिंदे केवळ विधिमंडळ पक्ष

आता पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार आहे...मात्र त्याआधीच राऊतांनी फेब्रुवारीत शिवसेना कुणाची हे ठरणार असल्याचं सांगितल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय.. आता फेब्रुवारीत तरी शिवसेनेचा निकाल लागणार की तारीख पे तारीख कायम राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका! चार अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Maharashtra News Live Update: वाशिम शहरातील पद्मतीर्थ तलाव आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले

Saturday Horoscope: या 5 राशींच्या नशिबात धनलाभाचे योग, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा शनिवारचे राशीभविष्य

जमीन व्यवहारांवर आता आयकर विभागाची नजर! 2 लाखांवरील व्यवहारांची माहिती थेट सरकारला जाणार

Accident News : घरात एकटा कमावता, महिनाभरानंतर कामावर परतला अन् विपरीत घडलं; डिलिव्हरी बॉयचा करुण अंत

SCROLL FOR NEXT