Aurangabad  विनोद जिरे
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये बॅनरबाजीतून शिवसेना- मनसे आक्रमक

जिथं मनसे तिथं शिवसेना, औरंगाबादेत बॅनरबाजी...

विनोद जिरे

औरंगाबाद: राज ठाकरे यांच्या सभेवरून आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) चांगलाचं राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडं सायंकाळी मनसेची (MNS) सभा होणार असतांना, दुसरीकडे मात्र, शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. शहरातील तापडिया नाट्य मंदिरात शिवसैनिक (Shiv Sainik) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी नाट्य मंदिरासमोर असलेल्या निराला बाजार परिसरात, "जिथं मनसे तिथं शिवसेना" असं चित्र पहायला मिळालं आहे. ज्या ठिकाणी मनसेचे बॅनर आहेत. त्यालगतचं शिवसेनेच्या प्रशिक्षण शिबिराचे देखील बॅनर लावण्यात आले आहेत.

हे देखील पाहा-

या बॅनरबाजीतून शिवसेना मनसे आमने- सामने आल्याचं चित्र असून यामुळं शिवसेना मनसे मधील राजकीय वातावरण चांगलाचं तापल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) हे शनिवारी औरंगाबाद (Aurangabad) मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत.

या सभेसाठी मनसेचे (MNS) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेमध्ये दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सभेची आठवडाभरापासून राज्यभर चर्चा सुरू आहे. पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याविषयी राज ठाकरे यांनी राज्य शासनाला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे त्यावर आज पुन्हा राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासोबतच हिंदुत्वाची गर्जना करत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे ही आपली ताकद दाखवणार अशी चर्चा आहे.

या सभेसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.दुसरीकडे या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद हे संवेदनशील शहर असल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहरात लावलेला आहे. आता सभेत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या सभेनंतर राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

SCROLL FOR NEXT