MLA Disqualification Case Saam TV
महाराष्ट्र

MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग; एकदिवस आधीच होणार सुनावणी, कारण काय?

Shiv Sena MLA Disqualification Case Updates: गुरुवारी १३ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता बुधवारी १२ ऑक्टोबरलाच होणार आहे.

Ruchika Jadhav

Shivsena 16 MLA Disqualification Case:

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. गुरुवारी १३ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता बुधवारी १२ ऑक्टोबरलाच होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Latest Marathi News)

सुनावणी लवकर घेण्यामागचे कारण काय?

सुनावणीच्या वेळापत्रकातील बदल ठाकरे गटाच्या याचिकेमुळे करण्यात आलेला नाही. जी २० देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबरला होणारी सुनावणी आता एक दिवस आधीच होणार आहे.

अशी असेल आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी

१२ तारखेला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल.

१२ ते २० ऑक्टोबर दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल.

२० ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.

विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीसाठी त्यांनी वेळापत्रक जाहीर केल्यावर ठाकरे गटाने यावर अक्षेप घेतला होता. सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरूवात होईल.

पुढील वेळापत्रक

२७ ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं ( स्टेटमेंट) मांडतील.

६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील.

१० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल.

२० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

२३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल.

सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrity Mangalsutra Designs: सेलिब्रिटींना घातलेली 5 युनिक मंगळसूत्र, या आहेत ट्रेडिंगच्या डिझाईन्स

Kamali Serial: तुला तर मी मारलंय ना? अनिकानेच रचला कामिनी आजीला मारण्याचा कट; 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट!

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महापौरांच्या कारवरील लाल दिवे काढण्यात आले

Copper Vs Glass Bottle Health: तांब्याच्या की काचेच्या बाटलीतील पाणी चांगलं? तुमच्या-आमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल

Bullet Train: 'मेड इन इंडिया' बुलेट ट्रेन लवकरच धावणार, तिकिटाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT