शिवसेना आमदारांचा राणे कुटुंबियांवरती हल्लाबोल!  SaamTV
महाराष्ट्र

बॉलिवूडच्या पार्ट्याना जायला सुद्धा अवकात लागते; 'या' शिवसेना आमदारांचा राणे कुटुंबियांवरती हल्लाबोल!

सगळी चित्रपट सृष्टी मुंबईमध्ये चालली ती ठाकरे परिवारामुळेच

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बॉलीवूड Bollywood मधील किंग खान King Khan म्हणून ओळख असलेला शाहरुख खानचा ShahRukh Khan मुलगा आर्यन खानला Aryan Khan अंमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये अमंली पदार्थ विरोधी पथकाने NCB अटक केल्यानंतर देशभर या बातमीची चर्चा सुरु असतानाच आता राज्यातील राजकारण्यांनी देखील यामध्ये उडी घेतली आहे. (Shiv Sena MLA criticizes on Rane family) राणे शिवसेना वाद नवा नसला तरी तो अनेकदा नव्याने पहायला मिळतो असच आणखी एकदा हा वाद समोर आला आहे. निलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंविरोधाक केलेल्या ट्विटला Tweet उत्तर देताना बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राणे कुटुंबियांवरती निशाना साधला आहे बॉलिवूड च्या पार्ट्याना जायला सुद्धा अवकात लागते आणि ती तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची नाही असं आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. (Shiv Sena MLA criticizes Rane family)

हे देखील पहा -

"संजय राऊत यांनी अमली पदार्थांच्या विषयावर बोलण्या अगोदर प्रमुखाच्या कुटुंबात कोणी अमली पदार्थांच्या आहारी तर गेला नाही ना याची खात्री करून घ्यावी. नशिबाने प्रमुखाचा पोर त्या बोटीवर न्हवता नाही तर बॉलिवूडची पार्टी असली की हा फुकट्या तिथे असणारच." असं ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं याला उत्तर देताना गायकवाडांनी राणेंवरती निशाना साधला.

खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्या बद्दल एकीरी भाषेमध्ये शब्दप्रयोग केला आणि पक्षप्रमुखांच्या कुटुंबातला कोणी बॉलिवुडच्या पार्टीत Bolyywood Party जातो असं राणे बोलत आहेत. मात्र बॉलिवुडच्या पार्ट्यांमध्ये जाण्यात गैर काय आहे? असा प्रश्न उपस्थित करत गायकवाड म्हणाले जर कोणाला आमंत्रण मिळत असेल एखाद्या बॉलिवूडच्या पार्टीमध्ये येण्याच तर जायला हवं मात्र ते आमत्रंण येण्याकरता आपली औकात लागते पण ती तुमची नाही.

तसेच ठाकरे परिवार आणि हिंदी संपूर्ण बॉलिवूड ठाकरे परिवारावरती प्रेम करते अगदी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन Amitabh Bachhan आणि बाळासाहेब ठाकरेंचे चांगले संबध होते एवढच नव्हे तर सगळी चित्रपट सृष्टी देखील मुंबईमध्ये चालली ती ठाकरे परिवाराच्या पाठिंब्यामुळेच असं देखील आमदार गायकवाड म्हणाले आहेत.

मी शाहरुख खानला ओळखत नाही -

मी कोण्या शाहरुख खानला ओळखत नाही नाही आणि त्याच्या मुलाला देखील ओळखत नसल्याच वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार NCB MLA Rohit Pawar यांनी केलं आहे तसंच जे अमली पदार्थ सेवन करतात असे लोक आपले रोलमॉडेल असता कामा नये असही ते म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात कडाक्याचे ऊन, पण विदर्भात अवकाळीचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Pune Fort : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Maharashtra News Live Update: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

Shocking: बुलडाणा हादरले! आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT