Shiv Sena Buldhana MLA Sanjay Gaikwad reaction on Gunaratna Sadavarte Maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: गाडी फोडण्याची शिक्षा कमीच, गुणरत्न सदावर्तेंना... शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

MLA Sanjay Gaikwad News: आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांची कार तोडली ही शिक्षा कमीच आहे. त्याला संपवायला पाहिजे होता, असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

MLA Sanjay Gaikwad on Gunaratna Sadavarte

मराठा आरक्षणावर सातत्याने विधाने करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं असून खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच मराठा आरक्षण (Maratha reservation) हिसकावल्या गेले. त्यांनी आरक्षणाविरोधीची बाजू इतकी प्रखरपणे कोर्टात मांडली, की जणू काही ते सुडानेच पेटले होते. आंदोलकांनी त्यांची कार तोडली ही शिक्षा कमीच आहे. याला संपवायला पाहिजे होता, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

गुणरत्न सदावर्ते संपले असते, तर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यांनी कोणी त्यांची गाडी फोडली, ते कमी झाले. यांची (गुणरत्न सदावर्ते) चांगली व्यवस्था करायला पाहिजे होती, असं देखील आमदार संजय गायकवाड म्हणाले. दरम्यान, गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यावर देखील आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठी काही उत्साही कार्यकर्ते गावबंदी करत आहेत. मात्र, अशी भूमिका घेऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांना अटक करा, सदावर्तेंची मागणी

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तोडफोड करणारे व्यक्ती हे मराठा क्रांती मोर्चाचे आहे, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इतकंच नाही तर मनोज जरांगे यांना अटक करा, अशी मागणी देखील सदावर्ते यांनी केली आहे. दुसरीकडे हा हल्ला कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, अशा प्रकारच्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT