Shivaji Maharaj Jayanti saam Digital
महाराष्ट्र

Shivaji Maharaj Jayanti: न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात घुमणार ‘शिवबाचं नाव’, शिवप्रेमींमध्ये भरणार ऊर्जा

Shivaji Maharaj Jayanti News: अमेरिकेतील छत्रपती फाऊंडेशनतर्फे यंदाची शिवजयंती न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे, या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात बिग हिट मीडियाची निर्मिती असलेले बहुचर्चित ‘शिवबाचं नाव’ हे गाणं शिवप्रेमींमध्ये ऊर्जा भरणार आहे.

Sandeep Gawade

Shivaji Maharaj Jayanti

अमेरिकेतील छत्रपती फाऊंडेशनतर्फे यंदाची शिवजयंती न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे, या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात बिग हिट मीडियाची निर्मिती असलेले बहुचर्चित ‘शिवबाचं नाव’ हे गाणं शिवप्रेमींमध्ये ऊर्जा भरणार आहे. महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेले ‘शिवबाचं नाव’ या प्रेरणादायी गाण्याच्या जल्लोषात अमेरिकेतील भारतीय नागरिक शिवरायांचा जयघोष करणार आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे प्रेरणास्रोत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते. महाराष्ट्रासह देशभरातून अमेरिकेत गेलेले युवक-युवतीदेखील दरवर्षी शिवजयंती साजरी करतात. यंदाच्या शिवजयंती उत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच ‘शिवबाचं नाव’ हे गाणे वाजवण्याचा निर्णय अमेरिकेतील छत्रपती फाऊंडेशनच्या सदस्यांनी घेतला आहे. समाजमाध्यमांवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले ‘शिवबाचे नाव’ हे गाणे वाजवून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनचे सदस्य विनोद झेंडे, स्वप्नील खेडकर, मुजम्मिल मुकादम, अपार दळवी, विजय सूर्यवंशी, प्रशांत भुमरे, महेंद्र सिनरे, माधुरी झिंजुडे यांनी जाहीर केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठमोळ्या कलाकारांच्या भूमिका

निर्माते इतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांच्या बिग हिट मीडिया या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेले ‘शिवबाचं नाव’ हे गाणे मराठी संगीत व चित्रपट क्षेत्रातील नामांकित संगीतकार प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी संगीतबद्ध केले आहे. या संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची व छायाचित्रणाची दुहेरी जबाबदारी अभिजित दाणी यांनी उत्तमरित्या निभावली आहे. ‘शिवबाचं नाव’ या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लोकप्रिय मराठमोळा अभिनेता विशाल निकम यांनी; तर महाराणी सईबाई यांची भूमिका अभिनेत्री अनुष्का सोलवट यांनी नेटकेपणाने साकारली आहे. याशिवाय चित्रपट व म्युझिकल अल्बम क्षेत्रातील नामवंत कलाकार विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळी, वैष्णवी पाटील, तृप्ती राणे यांनी जबरदस्त नृत्ये केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT