Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: पतीसोबत दुचाकीवरून प्रवास; मागून बिबट्याचा हल्‍ला, महिला ठार

पतीसोबत दुचाकीवरून प्रवास; मागून बिबट्याचा हल्‍ला, महिला ठार

रोहिदास गाडगे

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातून पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना बिबट्याने (Leopard) पाठीमागुन शिकारीच्या हेतुने हल्ला केला. या हल्‍ल्‍यात बिबट्याने (Leopard Attack) महिलेला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. पूजा जाधव असे मृत महिलेचे नाव आहे.

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील रहिवासी असलेली सदर महिला पतीसोबत दुचाकीवर घरी जात होती. या दरम्‍यान पिंपरखेड बोंबेमळा येथे लघुशंकेसाठी थांबली. याचवेळी बिबट्याने या महिलेवर हल्ला करत उसाच्या शेतात ओढत नेत ठार केले.

परिसरात घबराटीचे वातावरण

बिबट्याने या महिलेला उसाच्या शेतात ओढत नेत चेहऱ्याचा भागा भक्ष म्हणून गिळंकृत केला. त्यामुळे बिबट्याच्या भितीने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून याबाबत शेतकरी आक्रमक झालेत. या बिबट्याला जेरबंद करण्याचे मोठं आव्हान वन विभागापुढे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

ऑपरेशन टायर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT