Dhule Shirpur Lodge Girlfriend Boyfriend Police Action SaamTV
महाराष्ट्र

Dhule News: शिरपूर येथील लॉजवर अचानक पोलीस धडकले; कॉलेजचे तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत सापडले, परिसरात खळबळ

Dhule Crime News: धुळे शहरातील शिरपूर परिसरात असलेल्या गजबजलेल्या कॅफेसह एका लॉजवर बुधवारी पोलिसांनी अचानक छापेमारी केली.

भूषण अहिरे

Dhule Shirpur Lodge Police Action

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेचा भंडाफोड केल्यानंतर आता पोलिसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धुळे शहरातील शिरपूर परिसरात असलेल्या गजबजलेल्या कॅफेसह एका लॉजवर बुधवारी पोलिसांनी अचानक छापेमारी केली. यावेळी ५ जोडपी नको त्या अवस्थेत आढळून आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी (Police) तातडीने या जोडप्यांना ताब्यात घेतलं. यामध्ये ५ कॉलेज तरुणी आणि तरुणांचा समावेश होता. चौकशीअंती पोलिसांनी समज देऊन त्यांना सोडून दिलं. तसेच यानंतर असे कृत्य करताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही दिला.

त्याचबरोबर कॅफे मालक आणि लॉज चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. शिरपूर (Dhule News) पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कॅफे व लॉजमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या कॉलेजच्या तरुण-तरुणींमध्ये चांगलीच वचक निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून धुळे शहरासह परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण वाढलं आहे. अगदी आठवडाभरापूर्वीच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेचा भंडाफोड केला होता.

त्यानंतर शिरपूर शहरातील एका लॉजवर काही अविवाहित जोडपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी संबंधित कॅफेंवर व लॉजवर छापेमारी केली असता, येथून जवळपास पाच जोडपे अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत, त्यांना समज दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT