Shirpur Accident Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Accident : समोरून दुचाकी आल्याने ब्रेक मारला अन् अनर्थ घडला; ट्रॅक्टरखाली चिरडून एकाचा मृत्यू

Dhule News : चिलारे गावापुढे बाघी माता मंदिराजवळ त्यांच्यासमोरून विरुद्ध दिशेने दुसरी दुचाकी आली. त्यामुळे राजेंद्र चव्हाण यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला.

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : समोरून येत असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ब्रेक मारल्याने तोल जाऊन खाली पडला. यावेळी मागून आलेल्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात रोहिणीपासून सुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नुकताच घडला. अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

शिरपूर (Shirpur) तालुक्यात घडलेल्या अपघातात राजेंद्र यशवंत चव्हाण असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. मालेगाव तालुक्यातील हिसवाळ जामराव चव्हाण (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चुलत भाऊ राजेंद्र यशवंत चव्हाण यांच्याबरोबर दुचाकीने सुळे गावाकडे जात होते. दरम्यान दुपारी दोनला चिलारे गावापुढे बाघी माता मंदिराजवळ त्यांच्यासमोरून विरुद्ध दिशेने दुसरी दुचाकी (Accident) आली. त्यामुळे राजेंद्र चव्हाण यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला. तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. 

दुचाकीवरून खाली पडताच मागून वेगाने आलेल्या ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. या अपघातात राजेंद्र चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक किशोर चव्हाण तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

SCROLL FOR NEXT