Sambhaji Bhide Saam tv
महाराष्ट्र

Cases Filed Against Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार? शिर्डी, ठाणे, अमरावतीत गुन्हे दाखल

संभाजी भिडेंना महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार? शिर्डी, ठाणे, अमरावतीत गुन्हे दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिर्डी (अहमदनगर) : संभाजी भिडे यांनी साईबाबांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांसह साईभक्त आक्रमक झाले आहेत. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी साईबाबा संस्थानने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यासह ठाणे व अमरावती येथे देखील संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Breaking Marathi News)

संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतीबा फुले, महात्मा गांधी यासह साईबाबांवर खालच्या भाषेत वक्तव्य केले. यामुळे शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांमधून संताप व्यक्त होतोय. ग्रामस्थांनी तात्काळ साई संस्थान अधिकाऱ्यांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर साई संस्थानने संभाजी भिडे विरोधात शिर्डी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे हे मनोरूग्ण असून त्यांनी बेताल वक्तव्य थांबवावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.

साईभक्तांनी देखील (Saibaba Sansthan) संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. साईबाबांवर आमची श्रद्धा असून भिडेंचे वक्तव्य तेढ निर्माण करत असल्याच म्हटले आहे. तसेच महसुलमंत्री तथा शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील संभाजी भिडेंनी साईबाबांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भिडेंबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असुन अशी मुक्ताफळे उधळण्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याच म्हटले आहे.

नौपाडा पोलीसातही गुन्हा दाखल
ठाणे
: संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटून उठताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील नौपाडा पोलिसांना स्थानकात संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवून घेत नाही, तोपर्यंत ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. काही काळ पोलिसांसोबत चर्चा करून अखेरीस संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT