शिर्डी-साईभक्त महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्यावर कारवाई करा - शिवसेना महिला आघाडी गोविंद सोळुंके
महाराष्ट्र

शिर्डी-साईभक्त महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्यावर कारवाई करा - शिवसेना महिला आघाडी

संबंधित अधिकार्‍याची चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली

गोविंद साळुंके

शिर्डी - साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याने साईभक्त महिलेला अश्लील फोटो पाठवल्या संदर्भात राहता तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकार्‍याची चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून संबंधित प्रकार गंभीर आहे. साई भक्तांशी निगडित असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनात हा प्रकार आणून देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

हे देखील पहा -

राहता तालुका शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख स्वाती सुनील परदेशी यांच्यासह महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात त्यांनी म्हटले की, मुंबई आणि आसाम येथील साईभक्त महिलेला साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याने महिलेला अश्लील फोटो पाठवले तशी तक्रारही साई संस्थांकडे या महिलेने केली आहे. महिला म्हणून या प्रकारचा आम्ही निषेध करत आहोत या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महिला शिवसेना आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT