kamal singh rana, shirdi, madhya pradesh, rajasthan, shirdi polcie saam tv
महाराष्ट्र

Shirdi News : पोलिसांवर गोळीबार करुन पळालेला MP's Most Wanted गुंड कमल राणा टाेळीसह शिर्डीत जेरबंद; ३७ गुन्हे, ७० हजारांचे हाेते इनाम

Kamal Rana News : फिल्मी स्टाईल कारवाई करत पाेलिसांनी घेतले संशयित आरोपींना ताब्यात.

Siddharth Latkar

- संदीप बनसाडे

Shirdi News : मध्यप्रदेश येथे कारवाईसाठी गेलेल्या राजस्थान पोलिसांवर गोळी झाडून शिर्डीत दाखल झालेल्या संशयितांना पोलिसांना जेरबंद करण्यात माेठं यश आले आहे. शिर्डी पोलिस आणि जयपुर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कमलसिंग उर्फ कमल राणा (kamal rana) याच्यासह पाच संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Maharashtra News)

साईंच्या शिर्डीत दररोज हजारो भाविक साई समाधीच्या दर्शनाला हजेरी लावतात. राज्यच नव्हे तर देशभरातून भविकांसह गुंड देखील गर्दीच्या ठिकाणी आश्रयाला येत असल्याच अनेकदा समोर आले आहे.

आठ महिन्यांपूर्वी पंजाब येथील मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यातील पोलिसांच्या रडारावरील मोस्ट वॉन्टेड संशयितांना सर्च ऑपरेशन राबवत ताब्यात घेतले आहे.

या कारवाईबाब संदीप मिटके ( पोलीस उपविभागीय अधिकारी, शिर्डी) म्हणाले तीन दिवसांपुर्वी मध्यप्रदेशात कारवाईसाठी गेलेल्या राजस्थान पोलिसांवर संशयितांनी गोळी झाडत तेथून पळ काढला हाेता. त्यावेळी एक सरकारी पिस्तुल घेऊन ते पळाले हाेते. या गोळीबारात एक सहायक पोलिस निरिक्षक देखील जखमी झाला.

३७ गुन्हे, ७० हजारांचे इनाम

तेव्हापासुन राजस्थान पोलिस त्यांच्या मागावर होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी पोलिस आणि जयपुर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील एका हॉटेलात सर्च ऑपरेशन राबवले. त्यावेळी क्यूआरटी टीमच्या मदतीने मोठ्या शिताफिने राजस्थान मधील गुंड कमलसिंग उर्फ कमल राणा याच्यासह कुख्यात टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले. या टाेळीवर ३७ गुन्हे दाखल आहेत. तसेच टोळीवर ७० हजारांचे इनाम देखील असल्याची माहीती मिटके यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT